धोका वाढला : कोल्हापुरात आमदाराच्या घरातील चौघांना ‘कोरोना’ची लागण

corona

कोल्हापूर- कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. शासन आणि प्रशासन सर्व उपाययोजना करून कोरोनाला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कोल्हापुरात देखील दिवसेंदिवस कोरोंच्या रुग्णात कमालीची वाढ होत आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कोल्हापुरात आमदाराच्या घरातील चौघांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विद्यमान आमदाराचा मुलगा, सून, नातवासह नोकराला कोरोना संसर्ग झाला. आमदाराच्या घरातच चौघे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. चौघांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान, आज हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली. योगेश टिळेकर यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारीणीत टिळेकर यांची ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.’दोन दिवसापूर्वी ताप आणि कणकण आल्याने माझी व मुलाची कोविड तपासणी करुन घेतली असता तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.’ असे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.

दरम्यान, कालच पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबात स्वतः महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. मोहोळ यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘थोडासा ताप आल्याने मी माझी COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील’. या आशयाचे ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

धक्कादायक : भाजप आमदाराला कोरोनाची लागण

मोठी बातमी : लिलावती रुग्णालयात प्लाझमा थेरपीचा प्रयोग यशस्वी : राजेश टोपे

उदयनराजे भोसले की शरद पवार जाणून घ्या कोणाची आहे जास्त संपत्ती ?

IMP