‘दंगल’फेम झायरा वसीमचा विमानात विनयभंगाचा प्रयत्न; झायराने केला इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट

zaira wasim

मुंबई: दिल्ली ते मुंबई विमानप्रवास दरम्यान दंगल चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसीम हिच्या विनयभंगाचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. झायरान इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. विमानप्रवासा दरम्यान झायराच्या मागील सीटवर बसलेल्या पुरुषानं अश्लील वर्तन करायचा प्रयत्न केला.

झायरच्या पाठीला आणि मानेला हात लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिने विमानामध्येच व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला मात्र कमी प्रकाशामुळे तो निघाला नाही. त्यानंतर एअरपोर्टवर उतरल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये तिने एखादी व्यक्ती असं कसं वागू शकते. आता आम्हा मुलींनाच आमचं संरक्षण करावं लागणार असल्याच म्हंटल आहे.

https://www.instagram.com/p/Bcf4EgeA4P6/