पालकमंत्र्याच्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीस लोकप्रतिनिधींनी मारली दांडी

परभणी : खरीप हंगाम २०२१ पूर्व तयारी आढावा बैठक शनिवारी झाली. ही बैठक पालकमंत्री मलिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी अनेक लोकप्रतिनिधींची उपस्थिती नव्हती ही बाब समोर आली आहे. या वेळी केवळ दोनच आमदारांची उपस्थिती होती.

या आढावा बैठकीला परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती. या वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा संदर्भातील बैठकीत लोकप्रतिनिधींनी मारलेली दांडी बरेच काही सांगून गेली. तर सत्ताधारी आमदार या बैठकीला नसल्यामुळे परभणीकरांच्या भूवया उचावल्या आहेत. बियाणे खत  शेतकऱ्यांच्या बांधावर मिळतील
अशी घोषणा महाविकासआघाडी सरकारने केली होती. परंतु ती केली घोषणाच राहिली या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घोषणा न राहता शेतकऱ्यांच्या गावामध्ये महिला बचत गटामार्फत बियाणे व खत वाटप करण्यात यावे.

त्याचबरोबर खतांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदार घ्यावी. आणि मागील वर्षी बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. किती शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली. तसेच किती कंपण्यांवर कारवाई केली यासह अनेक मुद्दे उपस्थित केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बियाणे – ख़त शेतकऱ्यांच्या बांधावर मिळतील
अशी घोषणा महाविकासआघाडी सरकारने केली होती.परंतु ती केलेली घोषणाच ही हवेतच विरली आहे.

कोरोनास लॉकडाऊन, संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर घोषणा न राहता शेतकऱ्यांच्या गावामध्ये महिला बचत गटामार्फत बियाणे व खत वाटप करावेत. त्याचबरोबर खतांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदार घ्यावी. मागच्या वर्षी बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. या वेळी नुकसान झालेल्या किती शेतकऱ्यांना आर्थिक मदत  मिळाली तसेच किती कंपण्यांवर सरकारने कारवाई केली. हे मुद्दे जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केले.

महत्त्वाच्या बातम्या