जनप्रक्षोभातून राज्यभरात आंदोलन करणार – धनंजय मुंडे

dhananjay mundhe in maharashtra assmebly

टीम महाराष्ट्र देशा-बीड, सरकारच्या धोरणामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य हैराण झाले आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकार शेतकर्यांची घोर फसवणूक करत आहे. एकीकडे दीड लाखाचं कर्ज माफ झाल्याचं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात शेतकर्याचं 10 हजाराचं कर्ज माफ झाल्याचं उघड झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून विरोध केला आहे, परंतु आता सरकार अती करत आहे. म्हणून आपण राज्यभर अंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोर्चात जाहिर केले

विविध मागण्योाठी आज बीडमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला . धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात बीड जिल्ह्यातल्या वाडी-वस्ती-तांड्यावरच्या शेतकर्यांसह सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रचंड घोषणाबाजी केली. दुपारी 1 वाजता या मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरूवात झाली. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने करून त्यांचा सातबारा कोरा करा, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या, बीड जिल्ह्यातील लोडशेडींग बंद करा, मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व बारा बलुतेदार यांचे कर्ज सरसकट माफ करा यासह अन्य मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघाला. या मोर्चाचे नेतृत्व मुंडेंसह माजी मंत्री प्रकाश सोळंके, विधान परिषदेचे आमदार अमर सिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आ. पृथ्वीराज साठे, बाळासाहेब आजबे, अशोक डक, संदीप क्षीरसागर, नेत्यांनी केले. सध्या जिल्ह्यातील शेतकर्यांची आणि सर्वसामान्यांची परिस्थिती पाहता त्यांच्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर राज्य सरकारकडे नसल्याने ते प्रश्न घेऊन आज हा प्रचंड मोर्चा काढण्यात आल्याचे मुंडे यांनी जाहिर केले आता राज्याभर असे अंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले