बोंडअळी ,कायदा-सुव्यवस्था व घोटाळ्यांना वाचा फोडणार- मुंडे

धनंजय मुंडे

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्यातही बोंड अळी मुळे झालेले नुकसान आणि कायदा व सुव्यस्था, विदर्भाचे प्रश्न तसेच विविध घोटाळ्यांचे विषय हे मुद्दे लावून धरणार असल्याचे असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते पक्षनेते विरोधी पक्षनेते पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगीतले.

यासंदर्भात माहिती देताना मुंडे म्हणाले की, विरोधी पक्षांनी पहिल्या आठवड्यात कापसाच्या बोंडअळी आणि कर्जमाफीचा विषय लावून धरला बोंड अळीच्या प्रश्नावर सरकारने नुकसानभरपाई जाहीर करणे आवश्यक असताना केवळ पोकळ भाषणे केली शेतकऱ्यांना कोणताही दिलासा देणारा निर्णय घेतला नाही कर्जमाफी बाबत ही ही केवळ चुका झाल्याचे कबुली तेवढीच दिली या विलंबास कारणीभूत कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई केली, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी केंव्हा पोहचणार हे मात्र सांगितले नाही त्यामुळेच 18 डिसेंबरपासून सुरु होणा-या दुसऱ्या आठवड्यातही आम्ही हे विषय लावून धरणार आहोत.

नागपूर सह राज्यातील ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था आणि विविध खात्यातील घोटाळे तसेच विदर्भ व मराठवाड्यातील प्रश्नांबाबतही आम्ही जाब विचारणार आहोत आहोत. कर्ज माफी साठी साठी शेतकरी सरणावर उपोषण करू लागले आहेत विदर्भातील शेतकरी अंत्यविधीचे सामान आणून आत्महत्या करू लागले आहेत लागले आहेत तरीही सरकार गंभीर नाही याचा खेद वाटत असल्याचे मुंडे यांनी सांगितले.