पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँगेसकडून दामू शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पालघर निवडणूक

मुंबई – भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे, चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवासन वनगा यांनी ही निवडणूक शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतल्याने पालघर पोटनिवडणुक चर्चेचा विषय ठरलीये.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँगेसकडून तब्बल पाच वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या दामू शिंगडा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपने कॉंग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांच्या नावाची घोषणा केलीये.

Loading...

दरम्यान आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून काँगेसचे उमेदवार दामू शिंगडा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजपमधून शिवसेनेत आलेले श्रीनिवास वनगा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज भरलाय.

पालघरमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे राजेंद्र गावित, काँग्रेसचे दामू शिंगडा, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात ही लढाई होणार आहे. पण चौरंगी लढत होणार असली तरी भाजपचे राजेंद्र गावित आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांच्यातील लढत ही चुरशीची आणी रंगतदार होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाचे उमेदवार हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर