कार्यालयात पॉर्न पहिल्याने थेट उपपंतप्रधानांची खुर्ची गेली

damian green

टीम महाराष्ट्र देशा: कार्यालयीन कॉम्पुटरवर पॉर्न व्हिडिओ पाहिल्यामुळे एखाद्याची नौकरी गेल्याचही आजवर आपण एकल नसेल, मात्र कार्यालयात पॉर्न पहिल्याने थेट उपपंतप्रधानांना आपल पद गमवाव लागल्याची घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे निकटवर्तीय आणि फर्स्ट सेक्रेटरी ऑफ स्टेट (उपपंतप्रधान) असणारे डॅमियन ग्रीन यांना कार्यालयात पॉर्न पहिल्याने राजीनामा द्यावा लागला आहे. २००८ मध्ये हाऊस ऑफ कॉमन्सच्या कार्यालयातील कॉम्पुटरवर पॉर्न पहिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

२००८ मध्ये हाऊस ऑफ कॉमन्सच्या कार्यालयातील कॉम्पुटरवर ग्रीन यांनी पॉर्न पाहिल्याचे संसदीय समितीच्या चौकशीत सिद्ध झाले होते. त्यानंतर मंत्र्यांसाठी असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ग्रीन यांनी राजीनामा दिला.