भीमा कोरेगाव प्रकरणी हल्लेखोरांकडून नुकसान भरपाईही वसूल केली जाईल : पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधदुर्ग: भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे तसेच अनेक नागरिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे गृह राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषदेत सांगितले.

काय म्हणाले दीपक केसरकर?
भिडे गुरुजी किंवा एकबोटे यांना क्लीन चीट दिलेली नाही. कोणाविरुद्ध तक्रारी आल्या तर पूर्ण चौकशीशिवाय अटक केली जाणार नाही. भीमा-कोरेगाव या प्रकरणात चुकीचा मेसेज पसरवलेल्यांची चौकशी केली जाणार आहे. संबंधित हल्लेखोरांकडून नुकसान भरपाईही वसूल केली जाणार आहे. वडू बुद्रुकमध्ये खरी घटनेची सुरुवात झाली. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारा बॅनर समाजकंटकांनी लावला व प्रकरण भडकत गेले. जरी ५० जणांविरुद्ध अट्रासिटीचा गुन्हा दाखल केला असला तरी केवळ ९ जणांविरुद्ध चौकशीअंती कारवाई झाली आहे.

You might also like
Comments
Loading...