स्वयंघोषित गोरक्षकांनी मारहाण केलेल्या दलितांनी केला हिंदू धर्माचा त्याग

una dalit

अहमदाबाद: गुजरातच्या उना येथे गोरक्षक पीडित दलितांच्या एका समुहाने रविवारी हिंदू धर्माचा त्याग केला. यांना २०१६ मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आली होती. उना दलित अत्याचार प्रकरणातील एका कुटुंबासोबत जवळपास ३०० ते ३५० दलितांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यातंर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर या दलित कुटुंबीयांच्या धर्मांतराला अधिकृत मान्यता मिळणार आहे.

मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच गोरक्षकांच्या टोळक्याने त्यांची धिंड काढली होती,  त्यांना एका कारला बांधून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावरून केंद्रातील मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काल या तरूणांनी अन्य काही दलित बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला.

Loading...

दरम्यान, पीडित कुटुंबाने आणि इतर दलितांनी धर्मांतरादरम्यान शपथ घेतली की, ते केवळ बौद्ध धर्माला मानतील आणि हिंदू देवी-देवतांवर विश्वास ठेवणार नाही. हा दुसरा जन्म असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. याशिवाय, ‘आम्हाला हिंदूच मानले जात नव्हते, मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता. याच कारणामुळे आम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा