ठाण्यात आंदोलकांची रेल्वेरुळावर उतरुन घोषणाबाजी

ठाणे : भीमा-कोरेगावमध्ये घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आज सकाळी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक १आणि २ च्या रुळावर उतरुन घोषणाबाजी केली. तसेच ठाणे रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनांनीही सर्व रिक्षा-टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बंदची घोषणा केली.

दरम्यान, आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यभरात मोठी आंदोलने होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली होती.

महाराष्ट्र बंदमध्ये कल्याणमधील रिक्षाचालक-मालक संघटना सहभागी होणार असून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील रिक्षासेवा बंद राहणार आहेत. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनांच्या सुमारे सव्वा लाख रिक्षा आणि १० हजार टॅक्सी न चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...