पंडित नेहरूंबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून दलाई लामांनी मागितली माफी

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना दलाई लामा यांनी नेहरूंबद्दल भाष्य केले होते. महंमद अली जिना हे पहिले पंतप्रधान व्हावेत, असे महात्मा गांधी यांना वाटत होते. मात्र, स्वकेंद्री दृष्टीकोन असलेले जवाहलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले. जर जिना पंतप्रधान झाले असते तर भारताची फाळणी झाली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

Loading...

दरम्यान दलाई लामा यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना त्यांनी आता माफी मागितली आहे. माझ्या विधानामुळे वाद निर्माण झाला. जर मी चुकीचे विधान केले असेल तर मी त्यासाठी माफी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी यांचा फाळणीला विरोध होता. पाकिस्तान पेक्षा जास्त मुस्लीम भारतात होते. पण जाऊ द्या. आता हा भूतकाळ आहे, असेही त्यांनी यावेळी म्हंटले.

Akshay Kumar – अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी!Loading…


Loading…

Loading...