fbpx

अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ

टीम महाराष्ट्र देशा :  अंगारकीचतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटे 3 वाजेपासून भक्तांनि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. फुलांची नयनरम्य अशी मंदिरात सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत सर्व मंगल कलश वापरण्यात आले आहेत गणरायाचा अशीर्वादाचा वर्षाव सर्व भक्तांवर व्हावं या कल्पनेतून या सजावटीचा संकल्प करण्यात आला आहे.

अंगारकीचतुर्थीनिमित्त मंदिरात गायक प्रथमेश लगाटे याने स्वराभिषेक सादर केला आहे. अतिशय सुंदर अशी स्वरपूजा प्रथमेश लगाटे यांनी बाप्पाच्या चरणी सादर केली आहे. अंगारकीचतुर्थीनिमित्त पहाटे 3 वाजल्यापासून भक्तांनी आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणत रांग लावली होती यावेळी मंदिराला विविधरंगी फुलांची सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली तसेच अभिषेक, याग यांसह विविध धार्मिक विधी देखील मंदिरात पार पडली.

गनिमी कावा काय असतो हे सरकारला 9 ऑगस्टला कळेल

 

1 Comment

Click here to post a comment