भ्रष्ट कारभाराचे रोज नवे उच्चांक ; ठाकरे सरकारने करून दाखवले यात शंका नाही

uddhav thackrey

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे. यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे देखील नाव वाझेने घेतले आहे.

हा धक्कादायक प्रकार समोर येताच भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलेले आहे. ‘पुनर्वसन करण्यासाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी मागितल्याचा गौप्यस्फोट सचिन वाझेच्या कथित पत्रात करण्यात आला आहे. भ्रष्ट कारभाराचे रोज नवे उच्चांक निर्माण होतायत. ठाकरे सरकारने करून दाखवले यात आता कुणालाच शंका नाही.’ अशा आशयाचे ट्वीट करून भातखळकर यांनी टीका केला आहे.

वाझेनी सादर केलेल्या जबाबामधून आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यांनी एनआयए कोर्टासमोर हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे. यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे देखील नाव वाझेने घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या