हेल्थ टिप्स- रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे

वेब टीम- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. ताक हे दही किंवा सायीपासून बनवता येते. दही घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ संस्कृत साहित्यात आढळतात.

ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, ईथे खनिजे, रायनॉप्लेरीन व्हिटॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. ताक चाट मसाला टाकूनही आपण पिऊ शकतो.

ताक सेवनाचे भरपूर फायदे 

  • ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
  • लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून पिल्याने त्रास कमी होतो.
  • दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
  • ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
  • ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
  • थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
  • रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
  • ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
  • लहान मुलांना दात येते वेळी त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2-3 वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
  • तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.

ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेपटोकोकस, जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असतो. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करावा. नियमितपणे त्याचे सेवन केल्यास असिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.

You might also like
Comments
Loading...