‘अप्पा तुम्हाला कधी असं पाहिलं नाही’, निळ्या जर्सीत पाहून अश्विनची मुलगी चकित  

‘अप्पा तुम्हाला कधी असं पाहिलं नाही’, निळ्या जर्सीत पाहून अश्विनची मुलगी चकित  

ashwin

नवी दिल्ली : भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 पूर्वी आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अश्विन टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये दिसत आहे. ही जर्सी तीच आहे, जी टीम इंडियाविरुद्धच्या मेगा इव्हेंटमध्ये घातली जाणार आहे. मात्र, आर अश्विनची मुलगी या जर्सीबद्दल आश्चर्यचकित आहे, कारण मुलीने अश्विनला पहिल्यांदाच निळ्या जर्सीमध्ये पाहिले आहे.

अश्विन भारतासाठी शेवटचा 2017 मध्ये मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला होता आणि आता तो यूएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकात दिसणार आहे. अश्विन 15 सदस्यीय भारतीय संघाचा एक भाग आहे. टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळला जाईल आणि भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी दुबईत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध टी -20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. दरम्यान, अश्विनने इंस्टाग्रामवर आपल्या मुलीने  आश्चर्य व्यक्त केले असल्याचे सांगितले आहे.

अश्विनने टीम इंडियाची निळी जर्सी परिधान केली होती, त्यानंतर त्याच्या मुलीने त्याला विचारले होते की, पप्पा तुम्हाला या जर्सीमध्ये यापूर्वी कधीही पहिले नव्हते. याबद्दल अश्विनने इन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा मुलगी विचारते अप्पा मी तुला या जर्सीमध्ये पाहिले नाही’ असे म्हणत अश्विनने त्याचा निळ्या जर्शीतीत फोटो शेअर केला आहे. या फोटो अश्विन सोबत  त्याची मुलगी देखील उभी आहे.

महत्वाच्या बातम्या