“बाबा तुम्ही पटकन घरी या, तुमची खुप आठवण येत आहे”, डेव्हिड वॉर्नरच्या लेकीने वडीलांसाठी लिहिले भावनिक पत्र

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.

सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरही लवकर घरी जाण्यासाठी आतुर झाला आहे. स्पर्धा रद्द होताच वॉर्नरची लाडक्या लेकीने एक छोटेसे पत्र लिहीले आहे. या पत्रात तिने लिहीले की,’बाबा तुम्ही लवकरात लवकर सरळ घरी या. आम्हाला तुमची खुप आठवण येत आहे. लव्हयु, इवी, इंडी आणि आयलाकडून तुम्हाला खूप सारं प्रेम’ असे लिहत तिने त्यांच्या कुटूंबाचे एक छोटे चित्रही काढले आहे. हे चित्र असलेली पोस्ट डेव्हिड वॉर्नरने इन्साग्रामवर शेअर केले आहे.

वॉर्नरने या पोस्टमध्ये माझी लाडकी इवी खुप सारं प्रेम असे लिहत ही पोस्ट शेअर केली आहे. स्पर्धा रद्द होण्याआधी वॉर्नरची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. तर हैदराबादच्या झालेल्या पुढील सामन्यात त्याला अंतिम ११ मध्येही स्थान देण्यात आले नव्हते. तर या सामन्यात वॉर्नरला वॉटरबॉय आणि बॉलबॉयची भूमिका पार पाडावी लागली. या प्रकारानंतर वॉर्नरचे चाहते संतापले होते.

महत्वाच्या बातम्या