अनुष्का शर्माला ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन’ पुरस्कार जाहीर

Anushka Sharma

मुंबई: दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन’बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला जाहीर करण्यात आला आहे. अनुष्काने २००९ साली आदित्य चोप्राच्या रब ने बना दी जोडी ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.

अनुष्का शर्माला लवकरच ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अभिनय आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.