‘दादा’गिरी! ट्रोल झाल्यानंतर गांगुलीने पुन्हा पोस्ट केला ‘तो’ फोटो

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक आणि आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याच्या आयोजनासाठी बीसीसीआयचे एक पथक सध्या दुबई येथे आहे. काही दिवसापुर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने हे युएई मध्ये खेळवणार असल्याची घोषणा केली. या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात कायदेशीर बाबी पुर्ण करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसह अनेक अधीकारी दुबईतच आहे.

यादरम्यान दुबईत असताना गांगुलीने इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर एक कार रेसींग संदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. मात्र ट्रोल झाल्यानंतर गांगुलीने ती पोस्ट हटवली. मात्र दादागीरी साठी प्रसिद्ध असलेल्या गांगुलीने तो फोटो पुन्हा पोस्ट केला. आणि त्याला कॅप्शन देताना ‘काय माहीत हा फोटो डिलीट कसा झाला, पुन्हा एकदा बघा’ असे कॅप्शन दिले. गांगुलीच्या या पोस्टमुळे चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटकरुन दादागीरीचे कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीने जेव्हा भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा संभाळली तेव्हा त्याच्या आक्रमकतेमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मीळाली होती. गांगुलीला सहकारी लाडाने दादा हाक मारायचे त्यामुळे त्याच्या आक्रमक स्वभावाला दादागीरी असे म्हणले जाउ लागले. २००२ साली इंग्लंडमध्ये नेटवेस्ट ट्रॉफीत मीळालेल्या विजयानंतर गांगुलीने शर्ट काढुन हवेत फिरवला होता. ती आठवण आजही चाहत्यांच्या मनात ताजी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP