Dada Bhuse । नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगाव येथील एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर दादा भुसे (Dada Bhuse) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“शिर्डीहून मुख्यमंत्री हे सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या ठिकाणी पूजा केल्यानंतर ते माघारी फिरले. त्यामुळे हात दाखविण्याचा प्रकार झालेला नाही”, अशी माहिती दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सीमाप्रश्नाच्या वादावरून शिंदे सरकारवर टीका केली . होती यावर बोलताना दादा भुसे म्हणाले, “जोपर्यंत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो, तेव्हा चांगले होतो. आता मात्र अचानकपणे आम्ही वाईट झालो, असे नसते. आम्ही काल जे होतो तेच आजही आहोत. भविष्यातही आम्ही असेच राहणार.”
काय म्हणाले होते संजय राऊत?
“कुठे गेलाय तुमचा स्वाभिमान? कुठे शेण खातोय तुमचा स्वाभिमान?”, असे सवाल संजय राऊत यांनी राज्य सरकारला केले. “बाजूच्या राज्यातला एक मुख्यमंत्री आमची गावं खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय, एक राज्य आमचे उद्योग खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. षंढासारखे बसलात तुम्ही”, अशा शब्दात राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या ज्योतीष भेटीवर शरद पवार म्हणाले, “दौरा सोडून हात दाखवायला…”
- Vikram Gokhale | “डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत”, विक्रम गोखलेंबाबत सहकाऱ्याने दिली माहिती
- Udayanraje Bhosale | “बुद्धी भ्रष्ट…”, राज्यपाल, सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावर उदयनराजे संतापले
- Measles | लाखो मुलांनी लस चुकवल्यामुळे ‘गोवर’ झाला आहे जागतिक धोका
- Nitesh Rane | “जर दिशा सालियानची केस CBI कडे नव्हती तर…” ; नितेश राणे यांना शंका