लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे दूरदृष्टीचे नेते होते. संकटांवर मात करुन यशस्वी होण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होते. लोकांच्या भल्यासाठी चाकोरीबाहेरचे निर्णय घेण्याचं साहस त्यांनी अनेकदा दाखवलं. अमोघ वक्तृत्वं आणि हजरजबाबीपणाच्या बळावर त्यांनी विरोधकांना नामोहरम केलं, परंतु कुणाचा अवमान, अनादर कधी केला नाही म्हणून सर्वपक्षीय नेते विलासरावांचा उल्लेख आदराने करत असतात.
दरम्यान, विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी असून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. अभिनेता रितेश देशमुख याने देखील वडिलांसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. विलासराव आणि रितेशचं नातं हे खूपच प्रेमाचं होतं. विलासरावांच्या जाण्यानंतर त्याने अनेकदा दोघांच्या नात्याबद्दल तसेच विलासराव यांच्या व्यक्तिमत्वाबाबत माध्यमांसोमोर भाष्य केलं आहे.
आज विलासरावांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याने त्यांच्या पुतळ्याला वंदन करत असतानाचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला असून त्याला गाणं व भावनिक असं शीर्षक दिलं आहे. ‘बाबा मी तुमच्याशी रोज बोलतो, मला माहितीये तुम्ही मला ऐकता,’ असं म्हणत त्याने ‘तुजमे रब दिखता है’ हे हिंदी गाणे देखील जोडले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं विलासराव देशमुख यांना अभिवादन –
‘महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील विकासाभिमुख, सर्वसमावेशक दृष्टी असणारे नेतृत्व म्हणून माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील. लोकनेते स्व. देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हिंदुहृदयसम्राट तर गडकरींचा उल्लेख रोडकरी करत’; शिवसेना खासदाराने करून दिली ‘ती’ आठवण
- ‘प्रकाश आंबेडकर सोबत आले, तरच रिपब्लिकन ऐक्य शक्य’, रामदास आठवलेंची भूमिका
- पुण्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
- अभिनेता सुव्रत जोशी ‘जॅाबलेस’ वेब सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
- तालिबानी हिंसाचाराने गाठला कळस ; राष्ट्रपती राजीनामा देऊन कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत