fbpx

दाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे

टीम महाराष्ट्र देशा : डॉ.नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा तपास करण्यात महाराष्ट्रातील यंत्रणा अपयशी ठरत असून कर्नाटकातील तपास यंत्रणांवर अवलंबून राहण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. कर्नाटकातील यंत्रणांवर विसंबून न राहता स्वतंत्रपणे तपास करा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील यंत्रणांना फटकारले आहे. यामुळे या हत्यांच्या तपास प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हत्येचा तपास करण्यास सीआयडीच्या एसआयटीने तपास अहवाल सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्याप्रकरणांचा तपास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने बजावले.

‘कर्नाटकमध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींची तुम्ही चौकशी करणार. मात्र तुमच्या अहवालात आरोपींना पकडण्यास काय पावले उचलणार ?असा देखील सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.