सचिन अंदुरेच्या जप्त पिस्तुलातून दाभोळकर-गौरी लंकेश यांची हत्या

Narendra Dabholkar

टीम महाराष्ट्र देशा- डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांची हत्या एकाच पिस्तुलातून झाल्याचा दावा आज सीबीआयने कोर्टात केला. आरोपी सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातून या हत्या झाल्याची माहितीही सीबीआयने कोर्टात दिली.

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची राहत्या घरी हत्या

ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर ५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेने हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात केला.

दरम्यान,सीबीआय कोठडी दरम्यान दाभोळकर हत्येप्रकरणी काहीच तपास झालेला नाही. तपास झाला असेल तर त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट सीबीआयने सादर करावा. त्यामुळे सीबीआय कोठडी न देता न्यायालयीन कोठडीत देण्यात यावी असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे. सीबीआयने अकोलकर आणि पवार मारेकरी नसल्याचे मान्य करावे किंवा ते चार्जशीट चुकीचे होते हे मान्य करावे असेही ते म्हणाले.