सई मांजरेकरचा ‘या’ चित्रपटातील लुक होतोय व्हायरल

blank

टीम महाराष्ट्र देशा : मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज झाली आहे. ‘दबंग ३’ मध्ये ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातला सईचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.

‘दबंग’ अभिनेता सलमान खान यानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमातील सईचा लूक शेयर केला आहे. सई ही महेश मांजरेकर यांची मुलगी असून चित्रपटात बापलेकीची जोडी पाहायला मिळणार आहे.

सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘दबंग-३’ चा ट्रेलर २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सई मांजरेकर खुशी नावाचं पात्र साकारत आहे. खुशी ही चुलबुल पांडेची भूतकाळातील प्रेयसी असते.

सलमान, सोनाक्षी, सईसोबतच चित्रपटात अरबाज, महेश मांजरेकर, डिंपल कपाडिया, माही गिल आणि कन्नड स्टार सुदीप महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या