मुलाच्या कट्टर विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीत डी वाय पाटील यांचा प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल जेष्ठ कॉंग्रेस नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने आघाडीतील सुप्त संघर्ष नव्याने उफाळून येणार असल्याचे दिसत आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र आ. सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक असणाऱ्या  पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

डी वाय पाटील हे 1957 ते 1962 या काळात ते काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. 1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणून आले. पुढे 2009 ते 2013 या काळात त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहराचे राज्यपाल होते.

You might also like
Comments
Loading...