DY Chandrachud | नवी दिल्ली : न्या. डी. वाय. चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी बुधवारी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून केवळ ७४ दिवस काम करण्याची संधी मिळाली आहे.
मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली आहे लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले मात्र गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने त्यांना सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला होता. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजुने निकाल दिला होता आता न्या चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात चंद्रचूड यांची न्यायमूर्ती म्हणून १३ मे २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते. आधुनिक सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर या आधी न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले होते की, त्यांच्या वडिलांचा सरन्यायाधीश म्हणून प्रदीर्घ कार्यकाळ जवळून पाहिला आहे.
सर्व बदल होऊनही काही मूलभूत मूल्ये आहेत जी शाश्वत राहतात बंधुत्व, प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि समानता ही मुळात घटनात्मक मूल्ये आहेत १९५० किंवा २१ व्या शतकातील तिसरे दशक असो, आपला समाज आणि राष्ट्र मजबूत करण्यासाठी आपण त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.”. न्यायपालिका ही याचिकाकर्त्यांसाठी न्याय मिळण्याचे चांगले ठिकाण बनेल यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. “देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रचूड यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- Uddhav Thackeray | “या मंत्र्यांना हाकला, नाहीतर…” – उद्धव ठाकरे सत्तारांवर कडाडले
- Vijay Shivtare | “सरकार बनवण्यासाठी अजित पवार सकाळी गेले होते तेव्हा..”, विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
- MNS | “राष्ट्रवादी XXची औलाद”, मनसेच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली
- Amol Mitkari । ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावरून अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले,