राजाचा रंक; घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल

पुणे: नियती कधी कोणता खेळ खेळेल सांगता येत नाही, रस्त्यावर राहणाऱ्याला अलिशान बंगला मिळू शकतो तर बंगल्यातील व्यक्ती कधी रस्त्यावर येईल हे सांगता येत नाही, सध्या याच चित्र घराला घरपण देणाऱ्या डीएसके अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी यांच्या परिस्थितीवरून दिसत आहे, डीएसके हे सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असून तेथील फोटो व्हायरल झाले आहेत.

Loading...

ठेवीदारांची शेकडो कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी येरवडा कारागृहात आहेत. मध्यमवर्गीयांना घरं मिळवून देणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून डीएसकेंची ओळख होती. मात्र, आर्थिक करणामुळे ते अडचणीत आले. त्यातच हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये परतफेड करता येत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी  फेब्रुवारी महिन्यात त्यांना अटक झाली.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये डी एस कुलकर्णी यांनी त्यांच्या पत्नी हेमांगी यांच्या हातामध्ये गुन्ह्याची पाटी आहे व त्यावर कलमं लिहिली आहेत.

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...