डी.एस. केंना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवणार

डीएसके

गुंतवणूकदरांची आर्थिक फसवणूक प्रकरणी अटकेत असणारे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना २३ फेब्रुवारीपर्यत पोलीसा कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळी कोठडीत पाय घसरून पडल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. मात्र आता त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

ससून रुग्णालयात अपुऱ्या सुविधा असल्याने कुलकर्णी यांना पुरेशा पुढील उपचारासाठी खासगी रुग्णलायात दाखल करण्याची परवानगी डीएसकेंच्या वकिलांनी न्यायलायाकडे मागितली होती. न्यायालयाकडून ही मान्य करण्यात आल्यानंतर आता त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. तसेच पुढील काही दिवस डीएसके रुग्णालयात उपचार घेणार असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीचे रुपांतर न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलीस त्यांची चौकशी करु शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.Loading…
Loading...