घराला घरपण देणारे डी एस कुलकर्णी फरार ?

d s kulkarni

पुणे: ठेवीदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे. डी एस के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठेवीदारांचे ५० कोटी रुपये देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. मात्र मुदत संपूनही कुलकर्णी यांनी पैसे भरले नसल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. अटक टाळण्यासाठी पत्नी हेमंतीसह फरार झाल्याच दिसत आहे. दरम्यान पुणे पोलीसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

शेकडो ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करत मंगळवापर्यंत ( १९ डिसेंबर) ५० कोटी रुपये भरण्यासाठी मुदत दिली होती. मात्र त्यांनी ते भरले नसल्याने आता कोणत्याही क्षणी अटक होण्याशी शक्यता आहे.

IMP