डी.एस. कुलकर्णीनां दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे: शेकडो ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान आज या अर्जावर न्यायालयाने सुनावणी घेत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

मुदत ठेवीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप डीएसकेंवर करण्यात आला आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापा टाकून महत्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आले होते. दरम्यान न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनामुळे तूर्तास डी. एस. कुलकर्णी याना दिलासा मिळाला आहे.