बंडखोर आमदारांना भेटायला आलेल्या डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले

मुंबई : कर्नाटकातील राजकीय नाटयाचा खेळ आता मुंबईत सुरु झाला आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ‘काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,’ असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहीलं आहे.

दरम्यान, या आमदारांना कर्नाटकमधून भेटायला आलेले डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’