fbpx

डीएसकेंचा जेलमधील मुक्काम वाढणार; न्यायालयाने जामीन फेटाळला

डीएसके

पुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमांगी यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डीएसकें दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे.

गुणवंतदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आज कुलकर्णी यांच्या जामिनावर युक्तिवाद करण्यात आला. डी एस के आणि त्यांच्या पत्नी हेमांगी यांनी वेगवेगळ्या मार्गाने तब्बल 3 हजार कोटी रुपये जमवले असून, त्यापैकी चोविसशे कोटी इतरत्र वळवले असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. तसेच पूढील पोलिसांना आणखीन तपास करायचा असल्याने त्यांना जमीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर डीएसकें दाम्पत्याचा जामीन फेटाळण्यात आला.

1 Comment

Click here to post a comment