मनी लाँड्रिंग प्रकरण; भुजबळांना ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ यांच्याबाबत नवीन माहिती समोर आल्याने, लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ यांच्यासह इतर आरोपींना ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे आता काही दिवसांपूर्वीचं जामिनावर सुटका झालेल्या भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ जामीनावर तुरुंगातून बाहेर आलेत.आता कोर्टात काय सुनावणी होतीये याकडे लक्ष आहे. महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना 4 मे 2018 रोजी जामीन मंजूर झाला होता. तब्बल दोन वर्ष भुजबळांना तुरुंगात राहावं लागलं होतं

छगन भुजबळ यांची जामिनावर सुटका होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं होतं.तसंचं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांनी जोरदार भाषण देखील केलं होतं. महाराष्ट्र सदन उभारणीत भ्रष्टाचार केला नाही,आपण निर्दोष असून, आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला होता. मात्र आता छगन भुजबळ यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.