फोर्ब्सच्या धनकुबेरांच्या यादीत सायरस पूनावाला प्रथमच पहिल्या दहात सामील

सायरस पूनावाला

पुणे : फोर्ब्स या संस्थेकडून दरवर्षी जगातील तसेच देशांतील श्रीमंत व्यक्तींच्या यादी जाहीर केली जाते. यामध्ये यावर्षी फोर्ब्सच्या या धनकुबेरांच्या यादीत सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला प्रथमच पहिल्या दहात सामील झाले आहेत. सध्या कोरोना वरील लस निर्मिती नंतर पूनावाला यांचं मोठ योगदान अधोरेखित झालं आहे.

त्याचबरोबर या यादीमध्ये रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती ६.२७ लाख कोटी आहे. गौतम अडाणी दोन क्रमांक आहेत. त्यांची संपत्ती ३.७५ लाख कोटी आहे. यांनी यावेळी डीमार्टचे राधाकिशन दमाणी यांची जागा घेतली असून दामानी चार क्रमांकावर गेले आहेत. तीन नंबरवर एचसीएलचे संस्थापक नाडर असून त्यांची संपत्ती आहे १.७४ लाख कोटी.

तसेच सन फार्मास्युटीकलचे दिलीप संघवी सुद्धा पहिल्या दहात सामील आहेत. या यादीत दहाव्या नंबरवर सुनील मित्तल आहेत. त्यांची संपत्ती ७८.१२ हजार कोटी आहे. संख्या यंदा १४० वर गेली असून गेल्या वर्षी १०२ अब्जाधीश होते. तर यावर्षी मुकेश केवळ भारतातील नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत ठरले आहेत. अडाणी यांच्या संपत्तीत पाच पट वाढ झाली आहे आणि जगातील श्रीमंत यादीत ते २० व्या स्थानावर पोहोचले आहेत.

महत्वाच्या बातम्या