#अम्फानचा_कहर ! भयंकर चक्रीवादळामुळे प. बंगाल-ओडिशामध्ये मोठे नुकसान, काहीजण दगावले

cyclone 'Amphan'

पश्चिम बंगाल : अम्फान वादळाने भारताच्या पूर्व किनार पट्टीला चांगलेच झोडपले आहे. कोलकाता, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या बुधवारी या चक्रीवादळानं भयंकर रुप धारण केलं. अनेक परिसरांमध्ये मोठा पूर आला तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी वादळ येण्यापूर्वी ओडिशातील जवळपास 58 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हावडा आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यात वादळामुळे झाड अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.

या वादळाचे रौद्र रूप काहींनी कॅॅमेऱ्यात कैद केले आहे. तर सोशल मीडियावर याचे व्हिडीओ टाकले आहेत. या व्हिडीओमध्ये वाऱ्याच्या वेगाचा अंदाज आपल्याला येतोय. वाऱ्यामुळे झाड अक्षरशः कोलमोडून पडली आहेत. काही घरांचे पत्रे देखील उडाले आहेत. तर रस्त्यावर उभी असलेली वाहनं देखील वाऱ्यामुळे खेचली जात आहेत.

दरम्यान अम्फान वादळ रौद्र रूप धरण करणार हे हवामान खात्याने आधीचे सांगितले होते. या धोक्याच्या इशाऱ्यानंतर किनार पट्टी जवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. अम्फानचा फटका हा ओडिशा, पश्चिम बंगाल, काही अंशी विशाखापट्टणम किनारपट्टीला बसणार आहे.

IMP