“सायकल” चित्रपटाची टीम पुणेकरांच्या भेटीला !

पुणे: “आपला मानूस” चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम18 मोशन पिक्चर्स “सायकल” हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच रीलीज झालेल्या सायकल चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सायकल चित्रपटाची टीम आता येत आहे पुणेकरांच्या भेटीला, ज्यामध्ये चित्रपटाचे कलाकार प्रियदर्शन जाधव जाधव, हृषीकेश जोशी, दीप्ती लेले, मैथिली पटवर्धन तसेच दिग्दर्शक प्रकाश कुंटे आणि लेखक अदिती मोघे उपस्थित असणार आहेत.

Loading...

“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासा दरम्यान त्या चोरांचे काय झाले ? त्याला त्याची सायकल परत मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.

कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांचे मनं जिंकेल यात शंका नाही.

‘सायकल’ बद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाले, चित्रपटात आमची चोरांची पाचवी पिढी आहे. मुळात आम्ही गोड चोर आहोत. एक सायकल चोरल्यानंतर आमच्या आयुष्यात कसे झपाट्याने परिवर्तन घडते , ते चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने दाखवले आहे.

प्रियदर्शन जाधव म्हणाले, मी देखील चित्रपटात एका चोराच्याच भूमिकेत आहे. पण मी एक चतुर चोर आहे. त्यात परिस्थितीनुरूप आमच्याकडे सायकल येते. मुळात ती चोरण्याचा आमचा उददेश नसतो, पण ती चोरी आम्ही करतो पुढे काय घडते, हे चित्रपटात पहाणेच योग्य ठरेल.

ऋषिकेश जोशी म्हणाले, चित्रपटात मी अत्यंत समतोल पात्र साकारतो आहे. पंचक्रोशीतील लोकांना प्रेम आणि आपुलकी वाटेल, असे माझे व्यक्तिमत्व आहे. मी व्यवसायाने ज्योतिषी असल्याने मी भाकितं करतो. पण अचानक माझी सायकल चोरीला जाते त्यामुळे माझी अस्वस्थता आपणास चित्रपटात बघायला मिळेल

कलर्स मराठीचे बिजनेस हेड निखिल साने म्हणाले, मराठी चित्रपटांत सरशी बाजू असते ती कथानकाची. म्हणून मराठीत चित्रपट निर्मिती करणे आनंददायक वाटते. विशेष म्हणजे त्यातून आपल्याला आपल्या सभोवतालचा गोष्टी बघायला मिळतात. सायकल च्या माध्यमातून आपणास माणसा माणसातला चांगुलपणा अनुभवायला मिळेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ