CWG2018: भारतीय खेळाडूंनी केली पदकांची लयलूट, जाणून घ्या आज काय काय घडलं

sushil kumar

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रकुल स्पर्धेतील आजचा दिवस गाजवला तो भारतीय मल्लांनी. आज कुस्तीपटू सुशील कुमारनं राष्ट्रकुल स्पर्धेत ७४ किलो फ्रीस्टाईलमध्ये सुशील कुमारनं सुवर्णपदक जिंकलं . तर बीडचा पैलवान राहुल आवारेने पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

भारताची महिला गटातीला आघाडीची कुस्तीपटू बबिता फोगाटचे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले आहे. महिलांच्या 53 किलो वजनी गटात बबिताने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारली होती. मात्र अंतिम लढतीत बबिताला कॅनडाच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे बबिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सुपर मॉम मेरी कोम अंतिम फेरीत
एमसी मेरी कोमने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून महिला बॉक्सिंगमधील पहिल्यावहिल्या राष्ट्रकुल सुवर्णपदकाकडे वाटचाल केली आहे. याचप्रमाणे ७५ किलो गटात विकास कृष्णन, ६० किलो गटात मनीष कौशिक आणि ५२ किलो गटात गौरव सोलंकीने उपांत्य फेरी गाठून आपले पदक निश्चित केले.

– पैलवान सुशील कुमारकडून 74 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची अपेक्षापूर्ती; एकतर्फी कुस्तीत दक्षिण आफ्रिकेच्या बोथाचा 10-0 गुणांनी पराभव

– बीडचा पैलवान राहुल आवारेने पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची केली कमाई

– महाराष्ट्राची कन्या तेजस्विनी सावंत-दरेकरनेही रौप्यपदकाची केली कमाई, महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात तेजस्विनीने रौप्य पदक पटकावले

– बबिता फोगटनेही महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले

– किरणकुमारीने महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 76 किलो वजनी गटात कांस्य पदकाची केली कमाई

– मिश्र दुहेरी स्क्वॅशमध्ये भारताच्या दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषालची उपांत्यफेरीत धडक; वेल्सच्या खेळाडूंवर 11-8, 11-10 ने केली मात