Share

Debina Bonnerjee | ‘गुरमीत-देबिना’च्या घरी झाले गोंडस लक्ष्मीचे आगमन

मुंबई: टीव्ही अभिनेत्री देबीना बॅनर्जी (Debina Bonnerjee) हिने आज एका गोंडस लक्ष्मी (Baby Girl) ला जन्म दिला आहे. आपला आनंद व्यक्त करत देबीना आणि गुरमीत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. देबीनाने बाळाला जन्म देताच सोशल मीडिया अकाउंटद्वारे एक खास फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे.

 देबीना बॅनर्जी (Debina Bonnerjee) च्या घरी गोंडस लक्ष्मीचे आगमन 

आज देबीना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. देबीनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत कॅप्शनद्वारे या आनंदाच्या बातमीची माहिती दिली आहे. या पोस्टला तिने कॅप्शन दिले आहे,” या जगामध्ये आमच्या बाळाचे स्वागत आहे. आम्हाला पुन्हा पालक झाल्याचा खूप आनंद होत आहे. तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्ष आमच्यावर सदैव असाच राहू द्या.” ही पोस्ट बघून देबीना आणि गुरमीत चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा देत आहे.

देबीना बॅनर्जीने नुकतेच तिचे बोल्ड मॅटरनिटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर बराच वेळ ती चर्चेत राहिली होती. देबीनाच्या या फोटोशूटमुळे नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल देखील केलं होतं. देबीना आणि गुरमीत 3 एप्रिल 2022 रोजी पहिल्यांदा पालक झाले. देबीनासाठी पहिली गर्भधारणा सोपी नव्हती पण तिने हिंमत न हारता एका सुंदर मुलीला जन्म दिला होता.

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर देबीना आणि गुरमीत यांनी काही दिवसानंतरच दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली होती. या बातमीनंतर अनेक हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, आज या दोघांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचे स्वागत केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: टीव्ही अभिनेत्री देबीना बॅनर्जी (Debina Bonnerjee) हिने आज एका गोंडस लक्ष्मी (Baby Girl) ला जन्म दिला आहे. आपला आनंद …

पुढे वाचा

Entertainment