व्हायरल ‘बाबा का ढाबा’ला पुन्हा ग्राहकाची प्रतिक्षा

कांता प्रसाद

दिल्ली : ‘बाबा का ढाबा’ याची चांगलीच चर्चा मागील वर्षी झाली होती. लॉकडाउनमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. याचा आर्थिक फटका ‘बाबा का ढाबा’ चे ८० वर्षीय मालक कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांना बसला  याकाळात युट्यूबवर गौरव वासन याने यांचा एक व्हिडीओ शूट केला होता, ते पाहून लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

काही वेळातच लोकांनी त्यांच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी एक रेस्टॉरंटदेखील सुरु केलं होतं. मात्र इतक सगळ चांगले होऊन ही पुन्हा त्यांच्या नशिबी तोच ढाबा सुरु करण्यची वेळ आली आहे. ‘दिल्लीतील कोरोनामुळे त्यांचा जुना ढाबा १७ दिवस बंद ठेवावा लागला, त्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती आली आहे’ असे कांता प्रसाद यांनी सांगितले.

गेल्या वर्षी बाबा का ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांता प्रसाद यांना अनेक लाखांची आर्थिक मदत मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एक नवीन रेस्टॉरंट उघडले. घराची दुरुस्ती केली, जुने कर्जाची परतफेड केली. स्वत: साठी आणि आपल्या मुलांसाठी स्मार्टफोन खरेदी केली होती. आता मात्र त्यांचे हे चांगले दिवस गेले आहेत.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये कांता प्रसाद यांना आर्थिक फटका बसला मात्र त्यांना लोकांनी मदत केली होती. त्यानंतर मात्र त्यांना दुसरर्या लॉकडाऊनमध्ये त्यांचे हे रेस्टॉरंट बंद करण्यची वेळ आली. त्यामुळे ते आता ढाब्यावर परतले आहेत. पण पूर्वीसारखी कमाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची कमाई १० पटीने वाढली होती.

महत्वाच्या बातम्या

IMP