काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सध्याचे भाजप सरकार बेकार : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सध्याचे सरकार बेकार असल्याची बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मोदींवरील रागामुळे तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली.

‘नरेंद्र मोदी यांनी देश जितका खड्ड्यात घातलाय, त्यापेक्षा जास्त कुणीही घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवलं तरी त्याही ते करू शकत नाहीत,’ अशी तोफ देखील ठाकरे यांनी आज डागली.

महाराष्ट्रात भाजपा सेनेचे त्यापेक्षा वाईट हाल होतील असे सांगताना राज यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काय भूमिका असेल ते त्याच वेळी जाहीर करू असे सांगून राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स कायम ठेवला.