देशात नोटबंदीसदृश्य परिस्थिती ; ATM मध्ये पुन्हा खडखडाट

टीम महाराष्ट्र देशा : भारतामध्ये ऐतिहासिक ठरलेला निर्णय म्हणजे नोटबंदी या नोटबंदीला दीड वर्ष उलटून गेल आहे. या नोटबंदी दरम्यान देशातील बहुतांश ATM मध्ये नोटांचा तुडवडा जाणवला होता. आता पुन्हा एकदा देशात तशीच काहीशी परिस्थिती उद्भवली आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमधील चलन तुटवड्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. अशाच प्रकारचा चलन तुटवडा आता पूर्व महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमध्ये देखील निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चलन पुरवठा करण्यात आल्यानंतरही हा तुटवडा निर्माण झाल्याने काळजी वाढली आहे. गुडगाव येथे 80 टक्के एटीएममध्ये पैसे नसल्याचे समोर आले आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

नोटबंदी नंतर देशातील सगळ्याच ATM बाहेर लांबच – लांब रांगा आपण पहिल्या असतील ते भयानक चित्र डोळ्यासमोर उभ राहील तरी अंगावर अजूनही काटा येतो, मात्र देशात पुन्हा आता तशीच परिस्थिती उद्भवल्याने सर्वच स्थरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

नोटाबंदीनंतर जवळपास 5 लाख करोड रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या गेल्या. या नोटा चलनात आल्यानंतर मोठ्याप्रमाणात नोटांची चणचण दूर झाली. पण आता पुन्हा हे संकट वाढताना दिसतं आहे.

Shivjal