बायोकल्चर आणि कंपोस्टिंग पीटद्वारे करनार कचऱ्यावर प्रक्रिया

औरंगाबाद: महिन्याभरापासून शहरात कचरा जमा झाला आहे. शहरामध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून कम्पोस्टिंगसाठी लागणारे रसायन खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

जिल्हाधिकारी एन.के. राम यांनी सांगितले, यंत्र खरेदीवर जोर देऊन वेळ घालविण्यापेक्षा शहरात कम्पोस्टिंग वाढविणे आणि साचलेल्या कचऱ्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.

बायोकल्चर आणि कंपोस्टिंग पीटद्वारे प्रक्रिया करण्यासाठी पालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी जो कचरा जमा होतो तो कचरा रात्रपाळीत उचलण्यात येणार असून, या सर्व प्रक्रियेमध्ये शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.