उत्सुकता शिगेला ! गोकुळ दूध संघावर कोणाचा झेंडा ? मतमोजणीला सुरवात

gokul

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पाहायला मिळत होत. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं होतं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केला. न्यायालयाने सत्ताधारी गटाची याचिका फेटाळून लावली. आणि अखेर २ मे रोजी निवडणूक पार पडली असून जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी आज होणार गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? आहे. गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतकं झालं आहे. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

गोकुळ दूधसंघातील २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात होत असून दुपारपर्यंत मतदारांचा कौल कळणार आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या