निरा-भिमा पट्ट्यातील नागरिकांमध्ये द्रव्य खनिजाच्या उपलब्धतेबाबत कुतूहल

संग्रहित फोटो

पुणे : इंदापूर तालुक्यात भूगर्भात पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचे साठे असण्याची शक्यता गृहीत धरुन बोअरवेलद्वारे चाचण्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे निरा भिमा पट्ट्यातील नागरिकांमध्ये द्रव्य खनिजाच्या उपलब्धतेबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

इंदापूर तालुक्यातील बावडा, शेटफळ हवेली, राजवडी, आगोती, वकीलवस्ती, वडापुरी, तरंगवाडी, वनगळी, करेवाडी येथील वाड्या-वस्त्यांवर जमिनीत बोअरवेल घेऊन चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी बोअरवेल घेणाऱ्या दहा मशीन तसेच ट्रॅक्टरच्या वहानांचा ताफा कार्यरत आहे. देशातील गाळयुक्त खो-यात हायड्रोकार्बनचे साठे असण्याची शक्यता तपासण्यासाठी टू डी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम इंदापुरात सध्या जोरात सुरू असून प्रत्यक्षात भूगर्भात पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचे साठे शोधण्यास सुरुवात झाली आहे.

Loading...

शासनाने सॅटेलाईटद्वारे राज्यातील सर्वेक्षणाची स्थाने तसेच या ठिकाणचे अक्षांश व रेखांशांच्या मदतीने द्रव्यखनिज साठे शोधण्यास सुरुवात केली आहे. जीपीएसच्या मशीनने ही स्थाने मार्क करुन या ठिकाणी साडेचार इंचाचे बोअरवेल घेऊन त्यात पाणी भरून एक छोटासा ब्लास्ट केला जातो. यातून निर्माण होणार्‍या लहरी एका मशीनमध्ये संकलित करून याचा अहवाल भारत सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी किती प्रमाणात गॅस किंवा पेट्रोलियम पदार्थ आहेत हे समजणार आहे. याची चाचणी घेण्याचे काम इंदापूर तालुक्यात सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार