पंढरपुरात पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथिल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

pandharpur

पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

ही निवडणूक राष्ट्रवादीसह भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार असला तरी वंचितसह इतर काही अपक्ष उमेद्वारांमुळे निवडणुकीची चुरस अधिक रंगतदार होणार आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्य सरकारने रात्री आठ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. आता पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी १६ एप्रिल २०२१ रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते १८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी सात वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे. मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :