fbpx

यापुढे मनसेला मत देणार नाही- नाना पाटेकर; राज ठाकरेंची मिमिक्री नानांना झोंबली

पुणे: प्रत्येकाला बोलण्याचा आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे, राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला मी माझा मुद्दा मांडला यात राज ठाकरे यांच काही नुकसान झालेलं नाही, मात्र मनसेने आपलं एक मत गमावलाय असा टोला नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. ते पुण्यात झालेल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

फेरीवाल्यांचा मुद्द्यावरून राज ठाकरे आणि नाना पाटेकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. गरीब फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊ नये अशी भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली होती तर याला उत्तर देताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नाना पाटेकर यांची मिमिक्री करत त्यांना चांगलच फटकारल होत. आता या वादाचा पुढचा पार्ट म्हणजे नाना पाटेकर यांनी मनसेला मत न देण्याच जाहीर बोलून दाखवलं आहे.

आता राज ठाकरे या सगळ्याला कस उत्तर देतात याकडे सगळ्या महाराष्ट्रच लक्ष लागलं आहे.