Share

Jitendra Awhad | “खोटा आरोप, खोटा गुन्हा”, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच कार्यकर्ते आक्रमक

Jitendra Awhad | मुंबई : हर हर महादेव चित्रपटा प्रकरणी राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ७२ तासांमध्ये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशातच आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर मुंबई पोलिस ठाण्याबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले असून आंदोलनाला बसले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी एक भावूक तसेच इशारा देत ट्विट केलं आहे. या ट्विटमधून कार्यकर्त्यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली. कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याची भावना व्यक्त केली जात असून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Jitendra Awhad | मुंबई : हर हर महादेव चित्रपटा प्रकरणी राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ७२ तासांमध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now