fbpx

पहिल्या सामन्यात चेन्नईचा धमाकेदार विजय

टीम महाराष्ट्र देशा
आयपीएल २०१९ च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने ७ गडी राखून धमाकेदार विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून चेन्नईने बेंगलोर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. फिरकी गोलंदाजांनी केलेल्या जोरदार कामगिरीमुळे बेंगलोरचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. अनुभवी हरभजनसिंग आणि इम्रान ताहीरच्या फिरकीपुढे बेंगलोरचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. त्यांनी १७.१ षटकात सर्वबाद ७० धावा केल्या.

कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससह बाकीच्या फलंदाजांनी निराशजनक खेळ केला. बेंगलोर कडून यष्टीरक्षक पार्थिव पटेलने सर्वाधिक २९ धावा केल्या. अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. चेन्नई कडून हरभजनसिंग आणि इम्रान ताहीरने ३-३ गडी बाद केले तर रवींद्र जडेजा ने २ फलंदाजांना बाद केले. ७१ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली होती,परंतु अंबाती रायडू आणि सुरेश रैनाने डाव सावरला, त्यांनी सावध खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.