आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना

आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना

ipl

मुंबई : मे महिन्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच रद्द करण्यात आली होती. यानंतर काही दिवसातच बीसीसीआयने उर्वरीत स्पर्धा युएईत आयोजीत करण्याचा निर्णय घेतला. आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी आयपीएलचे संघ पुर्वतयारीला लागले आहेत. याच तयारीचा भाग म्हणून चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघ २० ऑगस्ट रोजी दुबईला रवाना होणार आहे. यात प्रामुख्याने भारतीय संघाचा भाग नसलेले खेळाडु असतील. चेन्नई सुपर किंग्सचे महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैनासह इतर खेळाडू असतील. तर आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पुर्वार्धात सहभागी नसलेला दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरहा दिल्लीकडून जाणारा प्रमुख खेळाडू आहे.

मागील वर्षी २०२० आयपीएल स्पर्धा कोरोना प्रादुर्भावामुळे दुबईत आयोजीत करण्यात आला होता. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. तर आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित होण्यापुर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालीकेत अव्वल स्थानी होता. आयपीएल नंतर लगेच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन युएई येथे होणार असल्याने आयपीएल स्पर्धेला महत्व प्राप्त झाले आहे.

महत्वाच्या बातम्या