‘देऊळ बंद’ तरी कळस दर्शनाने वारकऱ्यांनी भागवली विठ्ठल भक्तीची तहाण!

pandharpur

औरंगाबाद : आषाढी एकादशी म्हणजे भक्तांचा विठ्ठलाला भेटण्याचा दिवस. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी रद्द करावी लागली आहे. मात्र, भगवंताच्या भेटीसाठी शांत बसला तो वारकरी कसला, असे म्हणत मंदिर बंद असताना केवळ कळस दर्शनासाठी हजारो वारकरी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज एमआयडीसीच्या मंदिराबाहेर आले होते.

मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील कोरोनाच्या सावटाखालीच आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला. वाळूज एमआयडीसी परिसरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या विठ्ठल-रुख्मिनी मंदिर देखील कोरोनामुळे बंदच होते. मंदिर बंद असले तरी मराठवाड्याच्या विविध ठिकाणाहून हजारो भाविक भक्त विठूच्या दर्शनासाठी आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे आषाढीला परवानगी नसली तरी भक्तांमधील उत्साह पाहायला मिळाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यामुळे प्रति पंढरपूर येथील मंदिर यावर्षीही भाविकांसाठी बंद होते. मंदिर बंद असले तरी मात्र दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर परिसरात दाखल झाले होते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमामुळे दर्शन न झाल्याने भाविकांना निराश होत माघारी फिरावे लागले. केवळ कळसाचे दर्शन घेत भाविक माघारी फिरले. पोलिसांनी तीन ठिकाणी नाकेबंदी केली असल्याने काही भाविकांना कळसाचे दर्शन देखील झाले नाही, यावरून दिवसभर पोलीस व भाविकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्याचे बघायला मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP