fbpx

प. बंगालमध्ये मोदींच्या सभेला तुफान गर्दी, १४ मिनिटांतच भाषण संपवलं

टीम महाराष्ट्र देशा- पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर येथील रॅलीला झालेली प्रचंड गर्दी आणि त्यामुळं चेंगराचेंगरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या १४ मिनिटांतच भाषण संपवलं. या छोटेखानी भाषणात मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. दीदींनी हिंसेचा मार्ग का अवलंबला आहे, हे आजच्या रॅलीतील गर्दीचं दृश्य बघून माझ्या लक्षात आलं आहे, असा टोला त्यांनी लगावला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सभेत झालेल्या गोंधळामुळे काही महिला आणि मुलं जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. यापूर्वीही मोदींच्या मिदनापूरमधील सभेत मंडप कोसळला होता. त्यावेळीही काही जण जखमी झाले होते.
मोदींचं भाषण सुरू असताना तुफान गर्दी झाल्यानं काही लोक एकमेकांना धक्काबुक्की करू लागले. हे पाहून मोदींनी शांत राहण्याचे आवाहन केले. तुम्ही जेथे आहात, तेथेच उभे राहा, असं मोदी म्हणाले. अखेर चेंगराचेंगरीची शक्यता लक्षात घेऊन मोदींनी १४ मिनिटांतच भाषण आटोपलं.